पुणे : एकमेकांसोबत पाच वर्षांपासून प्रेम असताना, प्रियकराच्या कुटुंबीयांनी वेगळी जात असल्याच्या कारणावरून त्यांचे लग्न होऊ देणार नाही, असे सांगितले. तसेच, आजपासून बोलायचे नाही किंवा त्याला भेटायचे नाही, कसलाली संबंध ठेवायचा नाही, जे होते ते सर्व संपले, असा निरोप प्रियकराने तिला दिला. तिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने बघुन घेण्याची धमकी देत अपमान केला. त्यामुळे नैराश्यातून १७ वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुरसुंगी येथे २३ मार्च २०२५ रोजी घडली होती़. त्याबाबत तिच्या आईने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन फुरसुंगीमधील एका १७ वर्षाच्या तरूणावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरूणी आणि विधीसंघर्षित बालक हे दोघेही १७ वर्षांचे आहेत. मृत तरूणी अनुसूचित जातीमधील असल्याचे माहिती असून देखील विधीसंघर्षित बालकाने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्याने ती दुसर्या जातीची असल्याने घरातील लोक लग्न होऊ देणार नाहीत. त्यामुळे आजपासून त्याच्याशी बोलायचे नाही, किंवा त्याला भेटायचे नाही. कसलाही संबंध ठेवायचा नाही, असा निरोप त्याने तिला दिला.
Fans
Followers